बामणी-खडकी येथे मानवधर्माचे वार्षिक सेवक संमेलन व एकतेचे जनरल हवन 14 फारवरी ला

करियर महाराष्ट्र राजनीति शिक्षा स्वास्थ्य

बामणी-खडकी येथे मानवधर्माचे वार्षिक सेवक संमेलन व एकतेचे जनरल हवन 14 फारवरी ला

बामणी-खडकी (ता. सडक अर्जुनी) :
महानत्यागी बाबा जुमदेवजी मानवधर्म उगमस्थान टिमकी, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवधर्माच्या विचारांचा प्रचार-प्रसार व समाजात एकतेचा संदेश देण्यासाठी मानवधर्माचे वार्षिक सेवक संमेलन व एकतेचे जनरल हवन कार्य दिनांक शनिवार 14 फेब्रुवारी 2026 रोजी ग्राम बाम्हणी-खडकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भक्तिमय व शिस्तबद्ध वातावरणात होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य परमात्मा एक सेवक श्री रमेशभाऊ ठुब्रीकर (नागपूर) हे विराजमान असतील.कार्यक्रमाचे उपाध्यक्ष सुनील ढोबळे, उद्घाटक सुनील, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगराज खेडकर करणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन केवळ राम डोये,प्रमोद मटाले, देवानंद हतीमारे व परिसरातील मानवधर्म सेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6 ते 7.30 वाजता सामूहिक हवनकार्याने होणार आहे. हे हवनकार्य किशोर तरोणे, बामणी यांच्या निवासस्थानी विधीवत पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 8.15 ते 11.30 वाजेपर्यंतशोभा यात्रा हवनकार्य व सेवकांची चर्चा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत मानवधर्माच्या तत्वज्ञानावर, सेवकांची भूमिका, सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, नैतिक मूल्यांची जोपासना व मानवतेच्या सेवेसंदर्भात सखोल चर्चा करण्यात येईल .
सकाळी 11.30 ते 12.30 वाजेदरम्यान स्वागत समारंभ पार पडेल. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार. त्यानंतर एका भगवंताचे चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यक्रम दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत होईल .मानवधर्माचा मूळ उद्देश “मानवधर्म म्हणजे कोणत्याही जाती-धर्मापेक्षा श्रेष्ठ असा मानवतेचा धर्म असून एकाच भगवंतावर श्रद्धा ठेवून समाजात प्रेम, एकता व सद्भावना निर्माण करणे हाच त्याचा खरा अर्थ आहे”
कार्यक्रमाच्या शेवटी तीर्थप्रसाद व सामूहिक भोजन या संमेलनाला परिसरातील सेवक-सेविका, युवक-युवती, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन किशोर तरोणे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *