वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ; गावात भीतीचे वातावरण

अपराध महाराष्ट्र विदेश स्वास्थ्य

वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ; गावात भीतीचे वातावरण

गोंदिया : घराबाहेर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकावर वाघाने झडप घालत त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे गुरुवारी (१० एप्रिल) रात्री सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रज्वल गोवर्धन मेत्राम (वय ६ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. प्रज्वल हा घराजवळ खेळत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. क्षणातच वाघाने प्रज्वलला उचलून जंगलाच्या दिशेने ओढत नेले.

दरम्यान, कुटुंबीय व गावकऱ्यांनी आरडाओरड करताच वाघाने बालकाला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. काही वेळाने घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र, या भीषण हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेने संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *