सायबर जनजागृतीचा संदेश देण्यासाठी डुग्गीपार पोलिसांची ‘एकता दौड’; शनिवारी भव्य मॅरेथॉनचे आयोजन! शेंडा चौकातून रंगणार जनजागृतीचा उपक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे पोलिसांचे आवाहन

शिक्षा

सायबर जनजागृतीचा संदेश देण्यासाठी डुग्गीपार पोलिसांची ‘एकता दौड’; शनिवारी भव्य मॅरेथॉनचे आयोजन!

शेंडा चौकातून रंगणार जनजागृतीचा उपक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे पोलिसांचे आवाहन

सडक अर्जुनी : सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहारांचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सायबर जनजागृती मंथ २०२६ निमित्त डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य ‘एकता दौड’ अर्थात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

ही मॅरेथॉन शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता सडक अर्जुनी येथील शेंडा चौक येथे आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमातून सायबर सुरक्षिततेचा संदेश देतानाच नागरिकांमध्ये एकता, आरोग्य आणि सामाजिक जागरूकतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मॅरेथॉनच्या माध्यमातून नागरिकांना ओटीपी व पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, फिशिंगपासून सावध राहा आणि सायबर गुन्ह्यांची त्वरित तक्रार करा, असे महत्त्वपूर्ण संदेश दिले जाणार आहेत.

या उपक्रमात सर्व नागरिक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकता दौडमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *