फ्रीडम यूथ फाउंडेशनतर्फे गरबा क्लासचा शुभारंभ
गरजू व गरीब कुटुंबातील मुला-मुलींना तसेच अनाथ मुलींना मोफत गरबा प्रशिक्षण
साकोली, दि. २ सप्टेंबर २०२६ : येथील भारत सभागृह, नागझिरा रोड येथे फ्रीडम यूथ फाउंडेशनच्या वतीने गरबा क्लासचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. गरबा शिकण्याची आवड असलेल्या गरीब व गरजू कुटुंबातील मुला-मुलींना तसेच अनाथ मुलींना हा गरबा क्लास पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन साकोली नगराध्यक्षा सौ. देवेश्री कापगते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मनीष कापगते, नगरसेवक संदीप बावनकुळे, प्राचार्या सौ. मनीषा काशिवार तसेच व्ही.आय.पी. ग्रुपचे अध्यक्ष अनिल कापगते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी फ्रीडम यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांच्यासह संगीता पेंडाम, चेतन कोटागले, अनिकेत काणेकर, हेमंत चांदेकर, शुभम डोमळे, गौरव परमार, स्वामी नेवारे, हितेश शहारे, मोहित कराडे, कार्तिक लांजेवार, चिराग जाभुळकर, शुभम शेंद्रे, समीर बोडकेवार, प्रवीण कांबळे, समीर सूर्यवंशी, निशा भुरे, आर्यन मडावी, तुषार कापगते, सुधांशू बडोले, दिनेश पगाडे, नंदकिशोर पटले व भारत खुराना आदी उपस्थित होते.
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही मुला-मुलीला आपल्या आवडीच्या कलेपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने फ्रीडम यूथ फाउंडेशनने हा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम हाती घेतला आहे. गरबा शिकण्याची इच्छा असलेल्या गरीब व गरजू मुला-मुलींना या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
फ्रीडम यूथ फाउंडेशनच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवर तसेच नागरिकांनी कौतुक केले.

