लाखोंची इमारत उभी; आरोग्यसेवा मात्र गायब! पळसगाव उपकेंद्राला मुहूर्त कधी? आरोग्य विभाग सुस्त, लोकप्रतिनिधी गप्प; जनतेचा संताप

शिक्षा

लाखोंची इमारत उभी; आरोग्यसेवा मात्र गायब!

पळसगाव उपकेंद्राला मुहूर्त कधी? आरोग्य विभाग सुस्त, लोकप्रतिनिधी गप्प; जनतेचा संताप

सडक अर्जुनी मुन्नासिंह ठाकूर 

 सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव येथील उपकेंद्र सुरू न झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पळसगावसह राका, पिपरी, भदुटोला, मनेरी परिसरातील नागरिकांना या केंद्राचा लाभ अपेक्षित आहे. विशेषतः महिलांसाठी प्रसूतीची सुविधा जवळ उपलब्ध होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार होता. मात्र इमारत तयार असूनही सेवा सुरू न झाल्याने शासनाचा लाखो रुपयांचा खर्च नेमका कशासाठी, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

 

उपकेंद्र सुरू करण्यास नेमका अडथळा कुठे आहे? कर्मचारी नाहीत, साधनसामग्री नाही की आरोग्य विभागाची प्रशासकीय उदासीनता? याचे उत्तर संबंधित विभागाने जनतेला द्यावे.

लोकप्रतिनिधींचेही मौन का?

एवढ्या महत्त्वाच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न असताना संबंधित लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करीत आहेत का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असूनही प्रशासनावर दबाव आणून सेवा सुरू करून घेण्यासाठी पुढाकार कधी?

इमारत बांधणे हा विकास नाही; त्या इमारतीतून रुग्णांना वेळेवर सेवा मिळणे हा खरा विकास!

आरोग्य विभागाने आता केवळ आश्वासन न देता पळसगाव उपकेंद्र कधी सुरू होणार, याची निश्चित तारीख जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *