राका गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुगंध! ईद-ए-मिलादच्या रॅलीतून बंधुभावाचा संदेश
सडक अर्जुनी= तालुक्यातील राका येथे ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांकडून उत्साहात भव्य रॅली काढण्यात आली. शेकडो मुस्लिम बांधवांच्या सहभागाने निघालेल्या या रॅलीने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने गावातील नागरिकांना मिठाई व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, या उत्सवाच्या माध्यमातून राका गावातील हिंदू-मुस्लिम प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
रॅलीदरम्यान गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध समाजातील नागरिकांनी एकमेकांच्या सण-उत्सवांचा आदर करत ‘एक गाव, एक कुटुंब’ या भावनेचे दर्शन घडविले.
यावेळी नईम शेख, सलीम शेख, नौशादअली सय्यद, लियाकतअली सय्यद,अजीमखा पठाण, रफिकखा पठाण, यांच्यासह परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राका गावाने पुन्हा एकदा दाखवून दिले—सण कोणाचाही असो, आनंद मात्र संपूर्ण गावाचा! हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत ईद-ए-मिलादचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

