चिखलीत पतीचा क्रूर चेहरा उघड! कुऱ्हाडीने पत्नीची हत्या; सकाळी सात वाजता घटनेचा पर्दाफाश!

शिक्षा

चिखलीत पतीचा क्रूर चेहरा उघड! कुऱ्हाडीने पत्नीची हत्या; सकाळी सात वाजता घटनेचा पर्दाफाश!

सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. चिखली येथे पतीनेच पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रामकला जागेश्वर शिवणकर (वय ४१) असे मृत महिलेचे नाव असून, जागेश्वर आसाराम शिवणकर (वय ४६) असे आरोपी पतीचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २४ नोव्हेंबरच्या रात्री कुटुंबातील सर्वजण झोपले असताना ही घटना घडली. पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला. सकाळी सात वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के पथकासह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाकडूनही तपासणी करण्यात येत आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, या हत्येमागचे नेमके कारण काय? एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेचे सत्य पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे.

सध्या पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *