मुरदोली जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभागाकडून तपास सुरू

शिक्षा

मुरदोली जंगलात वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभागाकडून तपास सुरू

सडक अर्जुनी, प्रतिनिधी :

सडक अर्जुनी तालुक्यातील मुर्दुली वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच आवश्यक नमुने संकलित केले.

प्राथमिक माहितीनुसार, वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन व फॉरेन्सिक तपासणीनंतरच त्याबाबत निश्चित माहिती समोर येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.

वन विभागाने नियमानुसार मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली असून, सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा गंभीर विषय मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *