रेंगेपार-दल्ली येथे शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी गठित
सडक अर्जुनी= : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेंगेपार-दल्ली येथे दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नवीन शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यावेळी ललित डोंगरवार यांची अध्यक्षपदी, तर राजेश्वरी मेश्राम यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
समितीच्या सदस्यपदी धर्मराज उईके, विनोद बोरकर, आशा मरसकोल्हे, संध्याबाई ठाकरे, लक्ष्मीबाई डोंगरवार, योगेश बनसोड, गायत्रीबाई डोंगरवार, किशोर शेंडे, हंसराज कठाणे व भाग्यश्री मेश्राम यांची निवड करण्यात आली.
तसेच बालतज्ज्ञ भाग्यश्री मेश्राम यांची, तर शिक्षक तज्ज्ञ म्हणून लक्ष्मीकांत तागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी आर .बी . कुरसुंगे शिक्षक एन.डी.गानवीर सचिव यांच्यासह शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते. नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

