ब्राम्हणी खडकीत दुर्दैवी घटना – शेतात फवारणी करतांना घडली घटना

अपराध महाराष्ट्र शिक्षा स्वास्थ्य

ब्राम्हणी खडकीत दुर्दैवी घटना – शेतात फवारणी करतांना घडली घटना 
सडक अर्जुनी=

ब्राम्हणी खडकी येथील रहिवासी सुधीर राजेंद्र शिवणकर (वय अंदाजे 28 वर्षे) यांनी काल दिनांक 10/02/2025 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजताच्या दरम्यान शेतात फवारणी करतांना  धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून शिवणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व मोठा परिवार असा परिवार आहे.
आज दिनांक 11/02/2025 रोजी सकाळी गावातील तरुणांनी शोध मोहिम राबविली असता, दल्ली नाक्याजवळील शेतात  मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच दुग्गीपार पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार विजय कोटांगले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृतदेह पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बीट अंमलदार विजय कोटांगले करीत आहेत.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नेमके कारण काय याबाबत चर्चा सुरू आहे. पोलिस तपासानंतरच घटनेमागील सत्य स्पष्ट होणार आहे.
🕯️ ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *