सडक अर्जुनीत ओबीसींचा एल्गार! गांधी जयंतीच्या दिवशी सडक अर्जुनीत सत्याग्रह आंदोलन

शिक्षा

सडक अर्जुनीत ओबीसींचा एल्गार!

गांधी जयंतीच्या दिवशी सडक अर्जुनीत सत्याग्रह आंदोलन

जातीनिहाय जनगणनेसाठी सत्याग्रहाचा हुंकार

सडक अर्जुनी : महात्मा गांधी जयंतीनिमित्त ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने सकल ओबीसी महामोर्चाच्या महाराष्ट्रव्यापी सत्याग्रह आंदोलनांतर्गत सडक अर्जुनी तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन 2 ऑक्टोबर 2026 रोजी तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे करण्यात आले.ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या निश्चित होण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली.

या आंदोलनात युवा नेते महेशभाऊ डुभंरे, अशोक लंजे, अविनाश कासीवार, देवंचन तरोणे, तुकाराम राणे, दिनेश हुकरे, पुष्पाताई खोटेले, गायत्रीताई इरले, किरणताई हटवार, ओमराज दखने, उमराव मांढरे, तुलसी शिवनकर, सचिन फुंडे यांच्यासह ओबीसी समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

आंदोलनाच्या माध्यमातून जातीनिहाय जनगणना आणि ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *