मोगऱ्यात ! ‘हंबरते गाय वासराची’ नाट्यप्रयोगाची जय्यत तयारी

शिक्षा

मोगऱ्यात ! ‘हंबरते गाय वासराची’ नाट्यप्रयोगाची जय्यत तयारी

जय बिरसा नाट्य मंडळाचा खास मंडईनिमित्त भव्य उपक्रम; प्रेक्षकांना मिळणार मोफत मनोरंजनाची पर्वणी!

मोगरा : ग्रामीण भागातील नाट्यसंस्कृती जिवंत ठेवण्यासोबतच रसिक प्रेक्षकांना हास्य आणि मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी जय बिरसा नाट्य मंडळ, मोगरा सज्ज झाले आहे. खास मंडईनिमित्त आणि नागरिकांच्या आग्रहास्तव मोगरा येथे ‘हळबळते गाव बावराची’ या विनोदी नाट्यप्रयोगाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ठीक ९.३० वाजता हा नाट्यप्रयोग विनामूल्य सादर होणार आहे.

हास्याचे फवारे, सामाजिक वास्तवावर भाष्य आणि रंगमंचावर कलाकारांचा दमदार अभिनय! अशा मनोरंजनात्मक वातावरणात मोगरा नगरीत नाट्यप्रेमींना एक वेगळीच पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. लेखक विनोदजी राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाट्यकृतीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रामोशेजी पंढरे यांच्या भव्य बंद शामियान्यात हा नाट्यसोहळा रंगणार असून मोहन भावे, हेमराज दिवे, भोराज येधे, कलाधिप कुंभार, गणेश येधे, मनोज लोरवी, गणेश मेघाम यांच्यासह अनेक कलाकार आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहेत. महिला कलाकारांचाही या नाट्यप्रयोगात सहभाग राहणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. ज्ञानेश्वरी धनमाते, सहउद्घाटक म्हणून मा. शंकरजी कुरसाम व मा. महेशजी लेढे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. बी.सी. पटणे सर तर उपाध्यक्ष म्हणून मा. प्रतिभाताई दुबेरे यांची उपस्थिती राहणार आहे.

या आयोजनासाठी विलास शिवणकर, कृष्णा ठलाल, अमरलाल मरस्कोले, सुखराम पटणे, पटणे सर, संजय संयाम, शिवलाल ताराम, सुनीताबाई खरवडे, मुन्ना शेंडे, विलास ठलाल आणि ओमराज देखणे यांचे सहकार्य लाभत आहे.

जय बिरसा नाट्य मंडळाचे अध्यक्ष लेखलाल टेकाम, उपाध्यक्ष अरुण लेदे आणि सचिव विठ्ठल कुंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.

मंडईचा उत्साह, नाटकाची रंगत आणि हास्याचा जबरदस्त तडका!

मोगरा व परिसरातील नागरिकांनी, नाट्यरसिकांनी आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा, असे जाहीर आवाहन जय बिरसा नाट्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष आकर्षण : कोणतेही प्रवेश शुल्क नाही! सर्वांसाठी मोफत नाट्यप्रयोग!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *