२४ तासांपासून महामार्ग क्र. ५३ वर वाहतूक कोंडी! ट्रकच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचे हाल

शिक्षा

२४ तासांपासून महामार्ग क्र. ५३ वर वाहतूक कोंडी!

ट्रकच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचे हाल

सडक अर्जुनी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर गेल्या २४ तासांपासून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. सौंदड परिसरात यापूर्वीही सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 

ट्रकच्या रांगा वाढत असल्याने महामार्गावरील वाहतूक संथ झाली असून, वाहनचालकांना तासन्तास अडकून राहावे लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *