पेट्रोल पंप जवळील मौल्यवान सागवान चोरी
वन विभागाचे कर्मचारी सागवान चोरांची खबरी
सडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम बामणी खडकी लगत असलेल्या डोंगरगाव डेपो शेतशिवारा जवळील दोन पेट्रोल पंप चे काम सुरू आहे तसेच बामणी येथील दोन पेट्रोल पंप काम सुरू आहे
परिसरात चार पेट्रोल पंपांचे काम सुरू असताना डोंगरगाव शेतशिवारालगत असलेल्या महामार्ग क्रमांक 53 वरील लोहिया यांच्या पेट्रोल पंपा जवळील मौल्यवान सागवान चे झाड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संगमने विकल्या गेल्याची चर्चा जोर धरत आहे
डोंगरगाव शेत शिवार लगत असलेल्या लोहिया यांच्या शेताजवळील महामार्ग क्रमांक 53 ला लागून असलेले वन विभागाच्या हद्दीतील ते मूल्यवान सागवान झाड चोरीला गेले
. वनरक्षक वनपाल वनपरिक्षेत्र अधिकारी यांना संपूर्ण माहिती असून सुद्धा कोणतीही कारवाई अजून पर्यंत करण्यात आली नाही वन विभागाचे कर्मचारी अधिकारी हेच सागवान चोरांचे खबरी असल्याचे बोलले जात आहे वन विभागाचे वनरक्षक वनपाल वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सागवान ठेकेदार यांच्याकडून मोठी रक्कम मिळत असल्यामुळे कोणतेही कारवाही अजून पर्यंत करण्यात आली नाही त्या पेट्रोल पंपाजवळील विनापरवाना कापण्यात आलेले झाडे
संपूर्ण माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना असून सुद्धा अजून पर्यंत कोणतेही कारवाई करण्यात आली नाही
वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मोका चौकशी करून खबरी वनरक्षक वनपाल यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे
