जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

करियर महाराष्ट्र शिक्षा

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बामणी–खडकी :
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण अंताराम मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच विलास वटी, सोनू खोटेले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच शाळा समितीचे अध्यक्ष लेखचंद शेंडे व शाळा समितीचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व विविध उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद करत संविधानातील मूल्ये आत्मसात करून त्याचे पालन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक कृष्णा कावळे, शिवणकर सर, गायधने सर, वलथरे सर, पटणे सर, कोवे मॅडम, मेश्राम मॅडम व भंडारकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी व देशभक्तीच्या वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *