ब्राम्हणी खडकीत टोयाटो हायरायडर कारची मोटारसायकलला भीषण धडक!
दोन गंभीर जखमी, कारचालक वाहन सोडून फरार
सडक अर्जुनी | प्रतिनिधी
सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राम्हणी खडकी येथील मुख्य टी-पॉईंटजवळ इंडियन व भारत पेट्रोल पंप कडून ब्राम्हनि खडकी कडे जात असलेल्या मोटारसायकल चालकाचा मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास टोयोटा हायरायडर कार आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एका तरुणाचा एक पाय तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर कारचालक नामे शैलेशकुमार वलांदे अहमदाबाद गुजरात वाहन घटनास्थळी सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३५ बीडी ७४३२ क्रमांकाची मोटारसायकल भारत.इंडियन पेट्रोल पंप कडून ब्राम्हणी खडकीच्या दिशेने जात असताना टोयोटा कंपनीच्या नवीन हायरायडर कारने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोघेही गंभीर जखमी झाले.
या अपघातात महेंद्र युवराज पांधरे (वय ३५) आणि रिंकू परतेकी (वय १८), दोघेही रा. सलंगटोला, राजगुडा, अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर दोघांनाही तातडीने सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र दुग्गीपार चे पोलिश कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तसेच दुग्गीपार पोलीस ठाण्याचे बीट जमादार विजय कोटांगले, गणेश पवार आणि गुणवंत कठाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलिसांनी दुग्गीपार पोलीस ठाण्यात नेली. या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार विजय कोटांगले करीत आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील १०३३ क्रमांकाच्या हायवे पेट्रोलिंग पथकाने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून निघून गेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून अपघाताची नेमकी कारणे आणि कारचालकाबाबत अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

