राजोली बीट केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न! परिसरातील गावांना मिळणार तात्काळ पोलीस मदत; नागरिकांच्या सुरक्षेला मिळणार बळ

शिक्षा

राजोली बीट केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न!

परिसरातील गावांना मिळणार तात्काळ पोलीस मदत; नागरिकांच्या सुरक्षेला मिळणार बळ

किशोरी : पोलीस स्टेशन किशोरी अंतर्गत राजोली बीट येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या बीट केंद्राचे उद्घाटन माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेश तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या बीट केंद्रामुळे राजोली बीटअंतर्गत येणाऱ्या गावांतील नागरिकांना आता तात्काळ पोलीस मदत मिळणे अधिक सोयीचे होणार असून, कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करणे तसेच पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

सदर बीट केंद्राची संकल्पना महाराष्ट्र राज्याचे माननीय पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली, गोंदिया जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार प्रत्यक्षात साकारण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस सेवांचा लाभ अधिक जलद व प्रभावीपणे मिळणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह उपक्रम ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *