शिक्षक समितीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी येथे वृक्षारोपण
सडक अर्जुनी): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला. “एक वृक्ष, एक जीवन” हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षक समितीच्या ६४ वर्षांच्या संघर्षमय व गौरवशाली वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देत, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्य करणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही शिक्षकांची विश्वासार्ह संघटना असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शिक्षक समितीने गेल्या सहा दशकांहून अधिक काळ शिक्षकांचे हक्क, सेवा प्रश्न, विद्यार्थीकेंद्री शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे समाजाप्रती आपली जबाबदारी सातत्याने निभावली आहे. त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून हा वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी विजयकुमार सोनवाणे माजी सरपंच, राजेश कुमार सोनवणे अध्यक्ष शा. व्य. स. हिरालाल इळपाते, टीकाराम कावळे, प्रमोद चुटे, जूगराज लांजेवर, हेमराज लांजेवर, प्रदीप कावळे, गालिब शेख, देवानंद रहांगडाले, दीपक कावळे, रुपलाल कावळे, विनोद कांबळे, दिलीप कोचे, अशोक मेंढे, सागर पंधरे, वच्छला कोचे, राधिका चुटे, शीला सोनवाने, जयशीलाबाई कोचे, लिलाबाई मटाले यांनी उपस्थिती नोंदविले शेवटी ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर डोंगरवार मुख्याध्यापक, धम्मदीप साखरे सर, भुवन बागडे सर, श्यामा कुंडगीर मॅडम, माया तांदळे मॅडम, जितेंद्र कवरे सर, यांनी सहकार्य केले.
. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, भावी पिढीला हरित आणि समृद्ध भविष्य देण्याचा संकल्प आहे.
शिक्षक समितीने गेली ६४ वर्षे शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करताना समाजाप्रती असलेली बांधिलकीही जपली आहे. शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून समाजपरिवर्तनाचा शिल्पकार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये प्रत्येक शिक्षकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.
आज लावलेले प्रत्येक रोपटे उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहे. वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारूया. शिक्षक समिती समाजहित, पर्यावरण संरक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी यापुढेही अशाच विधायक उपक्रमांद्वारे कार्यरत राहील.

