पळसगाव राक्यात ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून!

शिक्षा

ब्रेकिंग न्यूज | पळसगाव राक्यात ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून!

रात्री घरातच थरार; सकाळी साडेसातला धक्कादायक प्रकार उघड — आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मोठी मोर्चेबांधणी!

सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव राका येथे खळबळजनक घटना

सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव राका येथे ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुसुम चैतराम कापगते (वय ८२) यांचा रात्रीच्या सुमारास खून झाल्याचे समोर आले असून, सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेने पळसगाव राका परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गोंदिया पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे, पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगलझोडे , पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, स्वान पथक तसेच डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.

वृद्ध महिलेचा खून नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले जात असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *