निधन वार्ता
सातलवाडा (ता. सडक अर्जुनी):
सातलवाडा गावाचे माजी सरपंच श्री वामन मेश्राम (वय 61 वर्ष) यांचे आज, दि. 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:55 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सातलवाडा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सातलवाडा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

