आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
शेंडा, ता. देवरी : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त Govt. Secondary and Higher Secondary Ashram School, Shenda येथे वन्यजीव संरक्षण, व्याघ्र संवर्धन व पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास वन विभागाकडून व्ही. पी. राहिले (क्षेत्र सहाय्यक, पांढरवाडी), व्ही. आर. सोडगीर (नियतक्षेत्र अधिकारी, कातरवाई), एम. डी. मुसळे (वनरक्षक, रिंगेपार), पी. आय. पाथोडे (वनरक्षक, शेंडा), वनरक्षक हटवार (कोयलारी), वनरक्षक बडोले (पांढरवाणी) तसेच इतर वन कर्मचारी उपस्थित होते.
शाळेच्या वतीने डॉ. संजय डी. गोट्टामवार (प्राचार्य), कु. एम. डी. उताणे (उच्च माध्यमिक शिक्षिका) आणि श्री. नितेश नेवारे (प्राथमिक शिक्षक) यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी नियतक्षेत्र अधिकारी व्ही. आर. सोडगीर यांनी विद्यार्थ्यांना व्याघ्र संवर्धन, वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व, जंगलांचे संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि वनसंपत्तीचे संवर्धन याविषयी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग व वन्यजीव संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान देण्याच

