पोलीस स्टेशन साकोलीची मोठी कारवाई        साकोलीतून गांजाची ट्रकने वाहतूक करणारी टोळी जेरबंद, जवळपास ₹1.35 कोटींचा मुद्देमाल जप्त

शिक्षा

पोलीस स्टेशन साकोलीची मोठी कारवाई

       साकोलीतून गांजाची ट्रकने वाहतूक करणारी टोळी जेरबंद, जवळपास ₹1.35 कोटींचा मुद्देमाल जप्त

साकोली | प्रतिनिधी

अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात साकोली पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सेंदूरवाफा टोलनाका येथे सापळा रचून ट्रकसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १९९.५६० किलो गांजा व ट्रक असा एकूण ₹१,३४,७८,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक २७ जुलै २०२६ रोजी पहाटे २.०० ते ३.०० वाजण्याच्या सुमारास साकोली पोलिसांना माहिती मिळाली की, टाटा कंपनीचा ट्रक (क्र. WB 23 F 8785) हा राजनांदगावकडून नागपूरच्या दिशेने जात असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सेंदूरवाफा टोलनाक्यावर नाकाबंदी केली. संशयित ट्रक थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता ट्रकमध्ये लपवून ठेवलेला १९९.५६० किलो गांजा आढळून आला.

या प्रकरणी ट्रक चालक पंकजकुमार भुषण यादव (वय ३०, बिहार) आणि क्लिनर बापी बादल मालीक (वय ३८, पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा क्र. ६०६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जितेंद्र राऊत करीत आहेत.

प्राथमिक तपासात आरोपींकडून गांजाची मोठ्या प्रमाणात राज्याबाहेर वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार व इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र राऊत, पोउपनि किशोर मानकर, पोउपनि अर्जुन बेडवाल, पोलीस हवालदार स्वप्नील गोस्वामी तसेच नरेंद्र झलके, सचिन राऊत, टेकचंद बुरडे, गोविंद शिंदे, धनविजय गणवीर आणि साकोली पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *