शाळा समिती अध्यक्षपदी लेखचंद शेंडे, उपाध्यक्षपदी नितेश चूटे शिक्षणतज्ज्ञपदी प्रगतशील शेतकरी प्रवीण तवाडे यांची नियुक्ती

शिक्षा

शाळा समिती अध्यक्षपदी लेखचंद शेंडे, उपाध्यक्षपदी नितेश चूटे

शिक्षणतज्ज्ञपदी प्रगतशील शेतकरी प्रवीण तवाडे यांची नियुक्ती

सडक अर्जुनी : तालुक्यातील ब्राह्मणी खडकी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत आज पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी लेखचंद शेंडे, तर उपाध्यक्षपदी नितेश चूटे यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रगतशील शेतकरी प्रवीण तवाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कार्यालय ब्राह्मणी खडकीचे सरपंच, उपसरपंच, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शाळेच्या शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी रागिणी थेर, मनीषा सोनुले, रिना शिवणकर, गीताबाई मरसकोल्हे, प्रगती चूटे, शिल्पा वैद्य, स्मिता मेश्राम, भूमीत राऊत आणि दीपिका तरोने यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *