प्रवीण जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; डुग्गीपार पोलिस ठाण्यात आदिवासी समाजाचे निवेदन

शिक्षा

प्रवीण जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; डुग्गीपार पोलिस ठाण्यात आदिवासी समाजाचे निवेदन

डुग्गीपार : आदिवासी समाजाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत प्रवीण नरसिंगराव जेठेवाड यांच्याविरोधात डुग्गीपार पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनानंतर प्रवीण जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

तक्रारीनुसार, सोशल मीडिया माध्यमांवर आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समाजबांधवांनी केली.

यावेळी राज्याध्यक्ष कर्मचारी संघटना यशवंत मलये, जिल्हा महिला अध्यक्ष छायाताई टेकाम, कच्चारगडचे संचालक भोजराज मसराम, गोंडवाना गोंड समाजाचे तालुका अध्यक्ष संतोष धुर्वे, तालुका महिला अध्यक्ष लता कुंभरे, कोषाध्यक्ष राजेश मंडारी, हलबा/हलबी समाज अर्जुनीचे तालुका सचिव संजय प्रधान, पीपल्स फेडरेशनचे सचिव संदीप धानगून, अस्विन प्रत्येके यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट व त्यामागील परिस्थितीची चौकशी झाल्यानंतर पुढील कायदेशीर बाबी स्पष्ट होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *