पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १७ जुन २०२६ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली
सदर कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक गोंदिया (कॅम्प देवरी) मा. श्री अभय डोंगरे यांच्यासह पोनि प्रविण मुंडे तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन लिपीक वर्गीय हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

