जीवन ज्योती ग्राम संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. ललिता बनसोड यांच्याकडून पंचशील बुद्धविहारास मेटी सप्रेम भेट

शिक्षा

जीवन ज्योती ग्राम संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. ललिता बनसोड यांच्याकडून पंचशील बुद्धविहारास मेटी सप्रेम भेट

सडक अर्जुनी: सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील पंचशील बौद्धविहाराला जीवन ज्योती ग्राम संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललिता चंद्रमुनी बनसोड यांच्याकडू पंचशील बुद्ध विहाराकरता मेटी दान देण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि बौद्ध धम्माच्या विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी पंचशील बौद्धविहारात आयोजित कार्यक्रमात बौद्ध स्मारक समितीचे अध्यक्ष लालचंद गजभिये, वर्षा तागडे, रचना बोरकर, शीला रामटेके, सरू मेश्राम, प्रेमलता तिरपुडे, लता कोटांगले माधुरी गेडाम अजंता मेश्राम तसेच बौद्ध महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.ललिता चंद्रमणी बन्सोड यांनी बौद्धविहाराला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. तसेच बौद्धविहाराच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच सामाजिक कार्यातही महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंचशील बौद्धविहारास देण्यात आलेल्या सप्रेम भेटीबद्दल बौद्ध स्मारक समितीच्या वतीने सौ. ललिता चंद्रमणी बन्सोड यांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महिला मंडळाच्या सदस्यांनीही सामाजिक एकजूट, महिला सक्षमीकरण आणि बौद्ध धम्माच्या विचारांचा प्रसार याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *