देवपायलीत अवैध रेती वाहतुकीला डूग्गीपार पोलिसांचा दणका! ट्रॅक्टरसह ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; डुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई

शिक्षा

देवपायलीत अवैध रेती वाहतुकीला डूग्गीपार पोलिसांचा दणका!

ट्रॅक्टरसह ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; डुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई

सडक अर्जुनी : देवपायली ते मोगरा मार्गावर सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीला डुग्गीपार पोलिसांनी चाप लावत धडक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह एक ब्रास गौण खनिज रेती असा तब्बल ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना देवपायली ते मोगरा मार्गावर अवैधरित्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते १०.०५ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी संबंधित परिसरात कारवाई केली. यावेळी एच.एम.टी. मॉडेल ४०२२ कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३५ जी ७४२७ तसेच एक ब्रास गौण खनिज रेती पोलिसांच्या हाती लागली.

या प्रकरणी  आरोपी सुखराम हेमराज पटणे वय 37 वर्ष राहणार मोगरा यांच्या वर गुन्हा क्र. ४७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाईची नोंद करण्यात आली आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अवैध रेती वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असून, यापूर्वीही विविध ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने व रेती जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पो.ह. विजय कोटांगले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *