देवरी–ब्राह्मणी मार्गावर ऑटोमधून पडून महिला जखमी; गोंदियाला हलविले चक्कर आल्याने घडली घटना; ऑटोचालकाने दाखविली तत्परता

शिक्षा

देवरी–ब्राह्मणी मार्गावर ऑटोमधून पडून महिला जखमी; गोंदियाला हलविले

चक्कर आल्याने घडली घटना; ऑटोचालकाने दाखविली तत्परता

सडक अर्जुनी | प्रतिनिधी

देवरी येथून ब्राह्मणी खडकीमार्गे कोहमारा येथे ऑटोने प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक चक्कर आल्याने ती ऑटोमधून खाली पडल्याची घटना आज, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.

आशा अशोक गोगा (वय ३५ वर्षे), रा. बोदालदंड, तालुका कोरची, जिल्हा गडचिरोली, असे संबंधित महिलेचे नाव आहे. त्या आपल्या दोन वर्षांच्या मुलगी साची अशोक गोगा हिच्यासह ऑटोने प्रवास करीत होत्या.

प्रवासादरम्यान आशा गोगा यांना अचानक चक्कर आल्याने त्या ऑटोमधून खाली पडल्या. घटना लक्षात येताच ऑटोचालकाने तत्परता दाखवत स्वतःच्या ऑटोने त्यांना तातडीने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर संबंधित महिलेला पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महिलेच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *