नवदुर्गा कर्ज वितरण मेळाव्यात १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरित सेवा संकल्प अभियानांतर्गत समृद्ध व हिरकणी महिला प्रभागसंघाचा पुढाकार

शिक्षा

नवदुर्गा कर्ज वितरण मेळाव्यात १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरित

सेवा संकल्प अभियानांतर्गत समृद्ध व हिरकणी महिला प्रभागसंघाचा पुढाकार

सडक अर्जुनी | प्रतिनिधी

तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सडक अर्जुनी अंतर्गत समृद्ध महिला प्रभागसंघ, शेंडा व हिरकणी महिला प्रभागसंघ, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत नवदुर्गा कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात महाराष्ट्र ग्रामीण बँक (MGB) व बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या माध्यमातून एकूण १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.

महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या मेळाव्याला महाराष्ट्र ग्रामीण बँक, सडक अर्जुनीचे शाखा व्यवस्थापक किशोर बच्चुवार, बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक महेश डडमल, तालुका अभियान व्यवस्थापक अतुल मुटकुरे, तालुका व्यवस्थापक सुहास परशुरामकर, समृद्ध महिला प्रभागसंघाच्या अध्यक्षा लताताई उरकुडे, प्रभाग समन्वयक लिभाष घरडे व दयानंद फुलझेले, कृषी व्यवस्थापक कोमल चांदेवार आणि मत्स्य व्यवस्थापक पवन माडारकर उपस्थित होते.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी बँक सखी, एफएलसीआरपी (FLCRP) तसेच अभियानातील कॅडर यांनी सहकार्य केले. महिला प्रभागसंघांच्या माध्यमातून महिलांना बँक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *