राजगुडा ग्रामपंचायतीत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार!
पाच गावांत भव्य रॅली; दारूबंदीच्या गजराने परिसर दुमदुमला
सडक अर्जुनी | प्रतिनिधी
सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या राजगुडा, सलंगटोला, मंदीटोला, मोठा मोगरा आणि लहान मोगरा या पाच गावांमध्ये दारूबंदीच्या जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली. गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दारूबंदीचा संदेश दिला.
सन २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या पाच गावांमध्ये दारूबंदीचा विषय ऐरणीवर आला आहे. गावातील काही दुकानदारांकडून दारू विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महिलांनी एकजूट दाखवत जनजागृतीचा पुढाकार घेतला. गावात दारूच्या व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांवर नियंत्रण मिळविणे आणि गावात शांततापूर्ण वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२६-२७ अंतर्गत दारूबंदी उपक्रमाच्या निमित्ताने पाचही गावांत रॅली काढून नागरिकांना दारूबंदीचे महत्त्व पटवून देण्यात आले. महिलांच्या मोठ्या सहभागामुळे या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
पोलीस व ग्रामविकास अधिकाऱ्यांची उपस्थितती
या उपक्रमाला डुग्गीपार पोलीस ठाण्याचे बीट जमादार विजय कोटांगले, गणेश पवार तसेच ग्रामविकास अधिकारी टी.आर.जनबंधू यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायत स्तरावर दारूबंदीबाबत जनजागृती करण्यासाठी महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
महिला व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग
दारूबंदी उपक्रमात अध्यक्ष शांताबाई संयम, अरुण लेदे , वर्षा लाडे, अनिता लेदे, देवानंद गेडाम, रंजूताई पटणे, पुष्पमाला पंचभाई, शिल्पा मेश्राम, सीमा घासले, पुरणलाल कोडापे, डी. एच. पटणे, सरपंच सुषमाबाई मरस्कुले, उपसरपंच लेखलाल टेकाम संघपाल वैद्य, लिकुताई मडावी, लता कडपते, कुंदा पटणे, सीमा पटणे, सूत्रधार मेश्राम, भैयालाल मडावी, वामन मरस्कोले आणि गोपालभाऊ शेडमते .यांच्यासह अन्य महिला व ग्रामस्थ सहभागी झाले.
पाचही गावांतील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दारूबंदीच्या मोहिमेला पाठिंबा दर्शविला. ग्रामीण भागात दारूबंदीबाबत जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
उपसरपंच सरपंच ग्रामपंचायत राजगुडा
लेखलाल टेकाम
जवान मुलांचा वेसण वाढला आहे ही लग्न करायची वेळ आहे आता मुली. मुले पाहणे सुरू आहे आता पाडून माझ्या आदिवासी समाजाचे व दुसऱ्या समाजाचे मुले आता पासून दारू च्या आहारी जाणार तर त्यांना मुले मुली कोण देणार. गावात 9 लोक दारू विक्री करतात त्यांनी दारू विक्री बंद करावी
उमेद ग्राम सखी
रेखा अरुण लेदे
पुरुष दारू पेहून घरी येतात. दारू प्यायला पैसे नसले तर जीवनाउपयोगी वस्तू ची विकी करून दारू सेवन करता. घरी आल्यावर पत्नी.मुलांना.मुलींना मारतारा ह्या मुझे घर उध्वस्त होत आहेत
त्या मूड आम्ही संपूर्ण उमेद. व ग्रामस्थ महिलांच्या पुढाकाराने चार ही गावात कडक रॉली काढून दारू बंद करण्यात आली

