सडक अर्जुनी येथे उद्या ‘रॉयल टायगर फिटनेस फॅमिली’चा आरोग्य मेळावा
जगदीशसिंह शेंगार व सडक अर्जुनी टीमच्या वतीने आयोजन; सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रम
सडक अर्जुनी : रॉयल टायगर फिटनेस फॅमिली, सडक अर्जुनी यांच्या वतीने रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोग्य मेळावा व गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन, शेंडा रोड येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन जगदीशसिंह शेंगार व सडक अर्जुनी टीमच्या वतीने करण्यात आले आहे. आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, फिटनेसचे महत्त्व पटवून देणे तसेच फिटनेस परिवारातील सदस्यांना एकत्र आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या आरोग्य मेळाव्यात फिटनेसप्रेमी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

