ब्राम्हणी खडकी येथे शारदा विसर्जन व कन्यापूजन उत्साहात संपन्न! बालगोपाल व महिलांच्या पुढाकारातून नऊ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल; ढोल-ताशांच्या गजरात शारदा मातेची भव्य मिरवणूक

शिक्षा

ब्राम्हणी खडकी येथे शारदा विसर्जन व कन्यापूजन उत्साहात संपन्न!

बालगोपाल व महिलांच्या पुढाकारातून नऊ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल; ढोल-ताशांच्या गजरात शारदा मातेची भव्य मिरवणूक

ब्राम्हणी खडकी | प्रतिनिधी

सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राम्हणी खडकी येथील बस टॉप परिसरातील राजतिलक शारदा व गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. बालगोपाल आणि महिलांच्या पुढाकारातून नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नवरात्रोत्सवादरम्यान दांडिया, भजन, जस गायन, खुर्ची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चमचा-गोटी यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नऊ दिवस चाललेल्या उत्सवात महिला, बालगोपाल आणि मंडळाच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

नऊ कन्यांचे पूजन करून कन्याभोजन

दि. २० ऑक्टोबर रोजी उत्सवाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त विधिवत नऊ कन्यांचे पूजन पत्रकार मुन्नासिंह ठाकूर व अस्मिता लेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कन्यापूजनानंतर कन्यांना भोजन देण्यात आले तसेच त्यांचा शृंगार करून सन्मान करण्यात आला. त्यानंतर गावकऱ्यांसाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

ढोल-ताशांच्या गजरात शारदा मातेची भव्य मिरवणूक

सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात शारदा मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नऊ दिवसांच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता उत्साहात करण्यात आली.

या नवरात्रोत्सवादरम्यान आपल्या अमृतमय वाणीतून भजन व आरती सादर करणारे ह.भ.प. गोपाल सोनुले, ढोलक मास्तर इंदल मेश्राम, मंडळाचे कैलास लेंडे, छत्राजीत हत्तीमारे, सोनी पांडे, आकाश भेंडारकर, दिनेश भेंडारकर, शरद शिवणकर, कुंदाबाई ढोमणे, दुर्गा सोनुले व बिंदिया टेंभेकर . संगीता भेंडारकार . सुमन तवाडे.माया हत्तीमारे . माधुरी भेंडरकार . मनिषा सोनुले.पुष्पा बनस्कर.योगिता कोरे.धार्मिक कार्यक्रमांत योगदान दिले.

यावेळी राजतिलक शारदा व गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्य, महिला, बालगोपाल आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने नवरात्रोत्सव भक्तिमय व आनंदमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *