फ्रीडम युथ फाउंडेशनतर्फे गरबा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; ६३ हजारांची पारितोषिके वितरित

शिक्षा

फ्रीडम युथ फाउंडेशनतर्फे गरबा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; ६३ हजारांची पारितोषिके वितरित

साकोली : नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा स्पर्धेतील विजेत्या संघांना फ्रीडम युथ फाउंडेशनच्या वतीने ६३ हजार रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली. स्पर्धेत साकोली येथील रासप्रिया ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. सेंदूरवाफा येथील युनिक दांडिया ग्रुप आणि भंडारा येथील लावण्या ग्रुप यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळविला, तर पवनी येथील युनिक दांडिया ग्रुप तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

प्रथम क्रमांकाच्या रासप्रिया ग्रुपला ३१ हजार रुपयांचे पारितोषिक आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वतीने प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांकाच्या दोन्ही संघांना संयुक्तपणे २१ हजार रुपयांचे पारितोषिक नितीन गुप्ता व व्हीएसएफ ग्रुप, साकोली यांच्या वतीने देण्यात आले. तृतीय क्रमांकाच्या पवनी येथील युनिक दांडिया ग्रुपला ११ हजार रुपयांचे पारितोषिक द लकीर ग्रुप, साकोली यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.

स्पर्धेत विविध गरबा संघांनी सहभाग नोंदविला. पारंपरिक गरब्याच्या ठेक्यावर सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तालबद्ध नृत्यसादरीकरण आणि आकर्षक कलाविष्कारामुळे स्पर्धेत रंगत निर्माण झाली. विजेत्या संघांना पारितोषिके देऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाला साकोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा देवेश्रीताई कापगते, सभापती शीतलताई राऊत, नगरसेवक तथा गटनेते संदीपभाऊ बावनकुळे, नगरसेवक कुणाल राऊत, माजी नगरसेवक मनीष कापगते, सपनभाऊ कापगते, नगरसेवक नयन पटेल, मीनाबाई लांजेवार, वैशाली लांजेवार, मेघा बडवाईक, प्रमोद गजभिये यांच्यासह पुष्पा कापगते, अमोल हलमारे, गणेश बोरकर, बंटी चुरे, एकांत हटवार आणि रोहित अग्रवाल उपस्थित होते.

स्पर्धेच्या आयोजनासाठी फ्रीडम युथ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांच्यासह हेमंत चांदेकर, छाया सिंगोर, संगीता पेदाम, चेतन कोटागले, गौरव परमार, शुभम ढोमने, स्वामी नेवारे, मोहित कराडे, अभिषेक परचाके, प्रवीण कांबळे, हितेश सहारे, शुभम शेंद्रे, कार्तिक लांजेवार, भाविक लांजेवार, नंदकिशोर पटले, आर्यन मडावी, समीर सूर्यवंशी, समीर बोडगेवार, हर्ष अथीलकर, तुषार कापगते, चिराग जनबंधू, मयूर सोनवणे, मनीषा कांबळे, प्राजक्ता बावनकुळे, पवन ठाकरे आणि आकाश मेघवानी यांनी सहकार्य केले. एसडीएमए भंडारा आणि साकोली सिटी इन्स्टाग्राम पेजचेही सहकार्य लाभले.

युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *