नवरात्रोत्सव निमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धे संपन्न
साकोली :-
जिकडे तिकडे नवरात्रोत्सव सुरू आहे . गरबा , रांगोळी स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा यासारखे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . आणि त्या अनुषंगाने फ्रिडम युथ फाउंडेशन साकोली च्या वतीने आज दिनांक 14 10 2026 ला भारत सभागृहाचे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . त्यात 30 स्पर्धकांनी भाग घेतला .या रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर शकुंतला कापगते माजी जिल्हा सदस्य , संगीता पेंदाम, पुष्पा कापगते, भारतीताई लंजे , छाया सिंगोर सचीव ,
स्पर्धेला परीक्षक म्हणून मा. अश्विनी झलके मॅडम. उपस्थित होते.फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष. किशोर बावणे, कार्तिक लांजेवार, किशोर रंगारी पत्रकार तथा संस्थापक मुकराबाई बहुउदेशीय संस्था कुंभली , अंकित कापगते पत्रकार , यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले . प्रथम पारितोषिक पल्लवी दोनोडे यांना
पाच हजार रुपयेचे बक्षीस शितलताई राऊत जिल्हा परिषद सदस्य भंडारा यांच्याकडून तर
द्वितीय पारितोषिक पायल सिंगोर यांना तीन हजार रुपयाचे बक्षीस स्वप्निल गोसामी महाराष्ट्र पोलीस ,यांच्याकडून ,तर
तृतीय रेखा तिडके यांना
दोन हजार रुपयाची बक्षीस इलेव्हन – इलेव्हन ब्रुच अँड ब्रृ साकोली तर्फे देण्यात आले . प्रथम पारितोषकाचे मानकरी प्रथम व द्वितीय तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना बक्षिसाचे वाटप करण्यात येणार आहेत.या रांगोळी स्पर्धा चे सहकार्य करण्यासाठी हेमंत चांदेवार,शुभम ढोमणे नंदकिशोर पटले,चिराग जनबंधू, हर्ष आथीलकर, चेतन कोटागले,पूनम लांजेवार मीनल कापगते यांनी सहकार्य केले –

