महेशभाऊ डुंभरे यांच्या शिवसेनेत भव्य प्रवेशाने सडक अर्जुनीच्या राजकारणात खळबळ
गोंदिया, २१ ऑगस्ट : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज गोंदिया येथील सभागृहात कोहमारा (सडक अर्जुनी) येथील युवा, तडफदार नेते श्री. महेशभाऊ डुंभरे यांनी मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह भव्य प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महेशभाऊ डुंभरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कोहमारा परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. युवा नेतृत्व म्हणून डुंभरे यांच्या प्रवेशाकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेला हा पक्षप्रवेश सडक अर्जुनीच्या राजकारणातील आगामी घडामोडींची नांदी ठरणार का? याबाबत आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

