अविरत हिरापुरी यांची सडक अर्जुनी युवासेना तालुकाप्रमुखपदी निवड!
शिवसेना संघटनेतर्फे नियुक्ती; कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
सडक अर्जुनी : शिवसेना गोंदिया जिल्ह्यातील संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये अविरत हिरापुरी (वैकुंठी उर्फ मुन्ना) यांची सडक अर्जुनी युवासेना तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना गोंदिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी नायडू व सडक अर्जुनी तालुकाप्रमुख विलासजी कापगते यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
या निवडीबद्दल अविरत हिरापुरी यांचे शिवसेना पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते व मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

