सडक अर्जुनीत ठाकूर परिवाराकडून छठपूजेचा भक्तिमय उत्साह! जगदीशसिंह शेंगार व प्रिया शेंगार यांच्या निवासस्थानी विधिवत पूजन

शिक्षा

सडक अर्जुनीत ठाकूर परिवाराकडून छठपूजेचा भक्तिमय उत्साह!

जगदीशसिंह शेंगार व प्रिया शेंगार यांच्या निवासस्थानी विधिवत पूजन

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी येथे ठाकूर परिवाराच्या वतीने छठपूजा महापर्व मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर रोजी जगदीशसिंह शेंगार व प्रिया शेंगार यांच्या निवासस्थानी छठी मातेचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी पारंपरिक धार्मिक विधींचे पालन करून छठी मातेची मनोभावे पूजा-अर्चना करण्यात आली. तसेच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.

छठपूजेच्या निमित्ताने ठाकूर परिवारातील सदस्यांनी एकत्र येत श्रद्धा आणि भक्तिभावाने हा पवित्र सण साजरा केला. पारंपरिक पूजाविधी आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

छठ महापर्वाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि कौटुंबिक एकोप्याचे दर्शन घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *