सौंदड येथील धम्मदीक्षा सोहळा ठरला ऐतिहासिक
हजारो बांधवांनी घेतली धम्मदीक्षा
सडक अर्जुनी
तालुका बौद्ध समाज संघ सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया तर्फे धम्म साधना बौद्ध विहार सौंदड येथे धम्मदीक्षा सोहळा आयोजीत करण्यात आला होता . या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून महाथेरो भदंत ज्ञानज्योती तसेच भंते नागसेन, भंते नागज्योती ,भंते नागसेन नागपूर, भिक्षणी धम्मकायां भंडारा यांचे प्रमुख उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे हा धम्मदीक्षा सोहळा केवळ तालुक्यासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक ,सोहळा ठरला.
सौंदड येथील धम्मदीक्षा सोहळ्याचे अवचित्य साधून तालुका बौद्ध समाज संघाच्या कार्यालयाचे व पतसंस्थेचे उद्घाटन शेंडा रोड सडक अर्जुनी येथे भंते यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर सडक अर्जुनी येथील संबोधी बुद्ध विहार येथून धम्म रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून दुचाकी वाहनांना पंचशील रश्मी ध्वज लावून रॅलीत हजारो समाज बांधव सहभागी झाले होते .ही धम्म रॅली कोहमारा मार्गे सौंदड येथील संविधान चौकात पोहोचताच संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याला भदंत धम्मज्योती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. धम्मसाधना बुद्ध विहारात रॅली पोहोचताच तालुका बौद्ध समाज संघ पदाधिकाऱ्यांच्या वतीने भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली .यानंतर तालुकास्तरीय बौद्ध विहार स्पर्धेचे पारितोषिक वितरित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक धम्मसाधना बुद्ध विहार सौंदड , द्वितीय क्रमांक धम्मज्योती बुद्ध विहार पुतळी, तृतीय क्रमांक पंचशील बुद्ध विहार शेंडा, या शिवाय त्रिरत्न बुद्ध विहार राका व तथागत बुद्ध विहार कोकणा यांनीं प्रोत्साहन पर पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल बुध्दविहार समिती पदाधिकाऱ्यांचा रोख राशी , स्मृतिचिन्ह व बुद्ध आणि त्याचा धम्म ही पुस्तिका देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. भिकू संघाच्या वतीने धम्मदेशना देण्यात आली. व लगेच महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांच्या हस्ते हजारो बांधवांना धम्मदीक्षा देण्यात आली. हा ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळा यशस्वी करण्यासाठी तालुका बौद्ध समाज संघाचे सर्व पदाधिकारी, तालुका मार्गदर्शक मंडळाचे पदाधिकारी, तालुका बौद्ध समाज संस्कार विधी समिती, शिक्षण व संविधान जागृती समिती तसेच तालुका बौद्ध समाज संघ अंतर्गत येणाऱ्या विविध समित्यांचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका बौद्ध समाज संघाचे अध्यक्ष महेंद्र चंद्रिकापुरे यांनी केले असून प्रास्ताविकातून तालुका बौद्ध समाज संघाची भूमिका विशद केली. संचालन तालुका बौद्ध समाज संघाचे मार्गदर्शक अनिल मेश्राम यांनी तर आभार दीक्षा समिती प्रमुख अशोक लांजेवार यांनी मानले. या धम्मदीक्षा सोहळ्याला तालुक्यासह इतर जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

