राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर ट्रकला आग; जीवितहानी टळली

अपराध महाराष्ट्र स्वास्थ्य

राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर ट्रकला आग; जीवितहानी टळली

सडक अर्जुनी: राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील शशिकरण मंदिर उड्डाणपुलाजवळ 01 जून रोजी पहाटे सुमारे 2 वाजताच्या दरम्यान रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 40 CM 4099 क्रमांकाचा ट्रक चालक तोशकलाल रजाराम शाहू (वय 42 वर्षे, रा. दुर्ग, छत्तीसगड) हे वाहन चालवत होते. अचानक ट्रकमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच वाहनाला आग लागली.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव येथील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच नगरपंचायत सडक अर्जुनी यांच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तावडे व महामार्ग पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहेत.

दरम्यान, महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *