धक्कादायक! डव्वा-चिरचाडी खजरी बीटमध्ये अवैध आंबा वृक्षांची कत्तल?
सडक अर्जुनी = वनपरिक्षेत्रातील डव्वा, चिरचाडी व खजरी बीट परिसरात शासकीय जमिनीवरील आंबा प्रजातीच्या झाडांची खुलेआम कत्तल सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. चिरचाडी .खजरी गावाजवळील पांदण रस्ता व टी.सी.एम. नाली परिसरात अवैध वृक्षतोड होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे संबंधित बीटमध्ये महिला वनरक्षक कार्यरत असून त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पतीकडून बीटचा कारभार चालवला जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या संदर्भात
वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांना विचारणा केली असता, “माझ्याकडे तक्रार आल्यास योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
अक्षय नंदेश्वर वनरक्षक डव्वा
काटेवार, “मॅडम यांच्या बीटमध्ये अशा प्रकारची कोणतीही झाडांची कत्तल झालेली नाही. मॅडम सध्या रूमवर आहेत. संबंधित ठेकेदाराबाबत माहिती द्या, मी त्याच्याशी बोलतो,” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अवैध वृक्षतोडीची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर आरोप खरे ठरले तर हा प्रकार वनसंपत्तीच्या संरक्षणावर गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरणार आहे.
टीप : वरील वृत्त स्थानिकांकडून प्राप्त तक्रारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित असून, अंतिम सत्यता शासकीय चौकशीनंतर स्पष्ट होईल.

