खरी कमाई’तून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे

शिक्षा

खरी कमाई’तून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे

कोयलारी जि. प. शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रम; विद्यार्थ्यांनी केला भाजीपाला विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव

सडक अर्जुनी= : जि. प. प्राथमिक शाळा, कोयलारी येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत शनिवार, 26 सप्टेंबर 2026 रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘खरी कमाई – भाजीपाला विक्री’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः भाजीपाला विक्री केली. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे, वस्तूंची विक्री, पैशांची देवाणघेवाण, संवादकौशल्य तसेच मेहनत व स्वावलंबनाचे महत्त्व समजावे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ग्राहकांशी संवाद साधत भाजीपाल्याची विक्री केली. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, व्यवहारज्ञान, संवादकौशल्य आणि स्वावलंबनाची भावना विकसित होण्यास मदत झाली.

या उपक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. मेश्राम, सहाय्यक शिक्षक श्री. डी. एच. राऊत व फुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी भारतीय सैनिक खेमराज पर्वते, हेमु जी. वालदे, विश्वजीत बडोले, सुनीता कोवाचे, यादोराव ब्राह्मणकर, संजय वालदे, तुळशी पर्वते, नरेंद्र वालदे, रमा जणबंधू, शीतल पर्वते, प्रणाली मौदेकर, सुप्रिया वालदे, सखाराम डोंगरवार, विजय कोहळे, शंकर ठाकरे यांच्यासह गावातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *