डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई!
सौंदडमध्ये 2 किलो 630 ग्रॅम गांजा हस्तगत; आरोपी ताब्यात
सडक अर्जुनी= : डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत सौंदड येथील शास्त्री वॉर्ड परिसरातील एका घरातून 2 किलो 630 ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 1 लाख 31 हजार 500 रुपये असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी रात्री डुग्गीपार पोलिसांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा सौंदड येथील शास्त्री वॉर्ड परिसरात गांजा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली.
पोलिसांनी विदेश संपत बडोले (वय 36 वर्षे) यांच्या घराची झडती घेतली असता घरातून 2 किलो 630 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून गांजा व संबंधित मुद्देमाल ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ₹1,31,500 आहे.
या प्रकरणात विदेश संपत बडोले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालासह आरोपीला कायदेशीर प्रक्रियेत घेण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध गांजा विक्री व साठवणुकीविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

