बाराभाटीत आज रंगणार ‘उधळलं पडतं घरटं माझं’ नाटकाचा मोफत प्रयोग! नाट्यरसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी; १८ नोव्हेंबरला रात्री १० वाजता प्रयोग

शिक्षा

बाराभाटीत आज रंगणार ‘उधळलं पडतं घरटं माझं’ नाटकाचा मोफत प्रयोग!

नाट्यरसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी; १८ नोव्हेंबरला रात्री १० वाजता प्रयोग

मोरगाव अर्जुनी: ग्रामीण भागातील नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नाट्यरसिकांना दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी देण्याच्या उद्देशाने बाराभाटी येथे ‘उधळलं पडतं घरटं माझं’ या सामाजिक, कौटुंबिक व विनोदी नाटकाचा भव्य मोफत प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ठीक १० वाजता बाराभाटी येथील आजाद चौक परिसरात नवरत्न नाट्य कला मंडळाच्या सौजन्याने हा प्रयोग सादर होणार आहे. दुधारामजी धरतकर यांच्या भव्य आवारात हा नाट्यसोहळा रंगणार आहे.

या नाटकाचे लेखक, निर्माता व दिग्दर्शक संजय फणसे असून, मुंबईतील अनुभवी कलाकार आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. नाटकात सामाजिक, कौटुंबिक आणि विनोदी आशयाची सांगड घालण्यात आली आहे.

विशेष म्हणजे नागरिकांसाठी हा प्रयोग पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बाराभाटी परिसरातील तसेच आजूबाजूच्या गावांतील नाट्यप्रेमींसाठी ही एक विशेष पर्वणी ठरणार आहे.

या नाट्यप्रयोगाला नागरिकांनी व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन नवरत्न नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किशोर बेळखोडे व किशोर येरणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *