सडक अर्जुनी तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

करियर महाराष्ट्र राजनीति शिक्षा स्वास्थ्य

सडक अर्जुनी तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

सडक अर्जुनी- १९ फेब्रुवारी २०२६: सडक अर्जुनी शहरातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने वतीने आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली. 

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलिस स्टेशन डूग्गीप्पार चे ठाणेदार गणेश वनारे, पो.महेंद्र सोनवाने.प्रमुख पाहुणे डॉ. सुशील लाडे, उद्योजक निलेश बोरकर जी, डॉ. चाटे वैद्यकीय अधिकारी, चुन्नीलाल जनबंधू सह मुख्याध्यापक, डॉ.दीपक उजवणे,आकाश गुप्ता,युवराज वालदे, सुधाकर कुर्वे माजी सरपंच, राजेश कोटंगले, रितेश गडपायले, संघाचे अध्यक्ष चंद्रमुनी बनसोड, उपाध्यक्ष निलेश शहारे ,सचिव मुन्नशिंग ठाकुर, तसेच संघाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निलेश शहारे यांनीं केले तर आभार प्रदर्शन चंद्रमुनी बनसोड यांनी मानले.

 

उपस्थित पत्रकारांनी शिवरायांच्या जीवनातील शौर्य, न्याय, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसंबंधी विचार व्यक्त केले. शिवजांतीच्या घोषणा दिल्या या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.

कार्यक्रमात बोलताना डॉ. सुशील लाडे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते न्याय, समता आणि स्वराज्याचे आदर्श आहेत. आजच्या काळातही त्यांचे विचार आम्हाला प्रेरणा देतात. पत्रकार म्हणून समाजात जागृती निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे, आणि शिवजयंतीसारखे कार्यक्रम भविष्यातही करत राहावे. 

यावेळी विविध पत्रकारांनी शिवचरित्रावर छोटे भाषण दिले, तर काहींनी शिवरायांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. कार्यक्रमात शिवभक्तीपूर्ण गीतांचे सादरीकरण आणि पारंपरिक वादनही झाले.

शिवजयंतीच्या निमित्ताने शहरातील इतर ठिकाणीही उत्साह दिसून आला. राज्यभरात शिवनेरी किल्ल्यावर भव्य ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ साजरा होत असताना, पत्रकार संघाचा हा कार्यक्रम स्थानिक पातळीवर शिवप्रेमींना एकत्र आणण्यात यशस्वी ठरला.

पत्रकार संघाच्या या उपक्रमाला शहरातील विविध स्तरांतील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वांनी अशा कार्यक्रमांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जय शिवराय!

जय महाराष्ट्र!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *