मोगरा–देवपायली घाटात रेती माफियांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प  – शशीकरण नदीचे मोठे नुकसान

अपराध महाराष्ट्र राजनीति शिक्षा

मोगरा–देवपायली घाटात रेती माफियांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प  – शशीकरण नदीचे मोठे नुकसान

सडक अर्जुनी : तालुक्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरालगत असलेल्या मोगरा–देवपायली घाटात रेती माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून रात्रीभर खुलेआम अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार फक्त मोगरा व देवपायली येथील शशीकरण नदी पात्रातूनच मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत ट्रॅक्टरच्या रांगा लागून रेतीची वाहतूक होत असून स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मोगरा, देवपायली व शशीकरण नदी परिसरातून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामागे तीन ते चार विभागातील काही अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची चर्चा रंगली आहे. दरमहा “मंथली” ठरल्यामुळे कोणतीही कारवाई होत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले असून दिवसेंदिवस चोरी वाढत आहे.

दरम्यान, शशीकरण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केल्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भविष्यात पाणीटंचाई, पर्यावरणीय नुकसान आणि पूरस्थितीचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रेती माफियांवर लगाम लावावा, अशी मागणी जोर धरत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *