ब्राम्हणी खडकीत धाडसी चोरी : मोबाईल शॉप फोडून 50-80 हजारांचा ऐवज लंपास, CCTV मध्ये चोर कैद

अपराध करियर महाराष्ट्र शिक्षा

ब्राम्हणी खडकीत धाडसी चोरी : मोबाईल शॉप फोडून 50-80 हजारांचा ऐवज लंपास, CCTV मध्ये चोर कैद

गोंदिया (प्रतिनिधी): महामार्गालगत असलेल्या ग्राम ब्राम्हणी खडकी येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत अश्विन मोबाईल शॉपमध्ये धाडसी चोरी केली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चार अज्ञात चोरटे एक पल्सर आणि एक स्कुटीवरून येऊन दुकान फोडत अंदाजे 50 ते 80 हजार रुपयांच्या मोबाईल व इतर साहित्यावर हात साफ केल्याची माहिती दुकान चालकाने MTVNews9 ला दिली.

या घटनेतील सर्व हालचाली दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. चोरी झालेल्या मोबाईलच्या IMEI नंबरच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सदर दुकान तुळशीदास खोटेले यांच्या घरात भाड्याने सुरू होते. या घटनेमुळे ब्राम्हणी खडकी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अलीकडील काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात प्रचंड दहशत पसरली आहे.

स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी पोलिसांनी तातडीने गस्त वाढवून चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *