सडक अर्जुनी येथे रुग्णांना ब्लँकेट, बेडशीट व फळांचे वाटप
सडक अर्जुनी : उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष (CMRF) चे माननीय श्री मंगेशजी चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी येथे रुग्णांना ब्लँकेट, बेडशीट व फळांचे वाटप करण्यात आले.
या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन मा. डॉ. चंद्रिकापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला युवासेना जिल्हा उपप्रमुख महेश भाऊ डुंभरे, विकी भाऊ तागडे, नागसेनजी फुले, गोवर्धनजी खोब्रागडे, करुणाताई गेडाम तसेच शिवसेना व युवासेनेचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच समाजसेवेचा संदेश देत गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला. या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

