महिलांच्या नव्या बचत गट स्थापनेसाठी ‘उमेद’ची मोहीम

शिक्षा

महिलांच्या नव्या बचत गट स्थापनेसाठी ‘उमेद’ची मोहीम

सडक अर्जुनी : महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ‘उमेद’ अभियानांतर्गत महिलांचे नवीन स्वयं सहाय्यता समूह स्थापन व नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम १३ ते २६ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील इच्छुक महिलांना एकत्र आणून नवीन बचत गटांची स्थापना व नोंदणी करण्यात येणार आहे. एका गटामध्ये १० ते २० इच्छुक महिलांनी एकत्र येऊन स्वयं सहाय्यता समूह स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन गटांच्या माध्यमातून महिलांना बचत व पतपुरवठ्याची सुविधा, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याचा ‘उमेद’ अभियानाचा उद्देश आहे.

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नवीन स्वयं सहाय्यता गट स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ‘उमेद’ अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.

“महिलांच्या प्रगतीचा ध्यास, उमेद अभियानाचा विश्वास!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *