चिरचाडी येथे २१ शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग झटका मशीनचे वाटप

शिक्षा

चिरचाडी येथे २१ शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग झटका मशीनचे वाटप

सडक अर्जुनी, दि. २७ ऑगस्ट २०२६ :

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामपारिस्थितिकीय विकास समिती, चिरचाडी यांच्या अंतर्गत वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आज दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी २१ लाभार्थी शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग (झटका मशीन) चे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी सोलर फेन्सिंग हा प्रभावी व पर्यावरणपूरक उपाय असून, या उपक्रमामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वन विभाग व ग्रामपारिस्थितिकीय विकास समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास मा. मिथुन देवचंदजी तरोने, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी यांच्यासह क्षेत्र सहायक डोंगरगाव/ख. मा. सी. एस. डोरले, मुख्याध्यापक मा. महेशजी भिवगडे, समिती अध्यक्ष मा. निताराम परसरामजी कोडापे, ग्रामपंचायत सदस्य मा. रमेश आनंदरावजी मेंढे, समिती सदस्य मा. धनिराम परसरामजी कोडापे, उपाध्यक्ष मा. सुभाष श्रीरामजी सलामे, बिट रक्षक कन्हारपायली मा. के. बी. चौव्हाण, समिती सचिव मा. नितीन पंढरीनाथजी मुंडे, ग्रामरोजगार सेवक मा. राकेश्वर हरिचंदजी गायधने, मा. प्रमोद यादोरावजी सलामे तसेच समितीचे सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंगच्या सुरक्षित वापराबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी वन्यजीव संवर्धनासोबतच शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी वन विभाग आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमामुळे चिरचाडी परिसरातील शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण मिळून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास हातभार लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *