कोहमारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळा

करियर राजनीति शिक्षा

कोहमारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम

सडक अर्जुनी : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कोहमारा यांच्या वतीने १५ मार्च २०२६ रोजी रविवारी ग्रामपंचायत कार्यालय कोहमारा येथे महिला मेळावा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सन्मानासाठी व त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता दीपप्रज्वलनाने होणार असून त्यानंतर सकाळी ११.३० वाजता वेषभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते १२.३० दरम्यान विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये फुगे फुगविणे व मेणबत्ती विझविणे यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. त्यानंतर दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कोहमारा, तथागत ग्रामसंघ, आराधना ग्रामसंघ आणि समस्त ग्रामवासी कोहमारा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन सरपंच सौ. प्रतिभा देविदास भेंडारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *